Skip to Content

​मुसंडी

प्रेम, संघर्ष आणि समाज एका सैनिकाची लेखणी – व्यवस्थेला ​प्रश्न विचारणारी कादंबरी.


मराठी वाचकांसाठी खास ऑफर ₹370  चे पुस्तक ₹289 मध्ये घरपोहच!

पुस्तक खरेदी करण्यासाठी वरील बटणावर क्लिक करून ऑर्डर करा.


पुस्तक प्रकाशन सोहळा

एका सैनिकाला सलाम

सीमेवर उभा राहून शत्रूशी लढताना, त्याच्या मनात मात्र शब्दांची लढाई सुरू असते. कर्तव्य कठोर असते, दिवस-रात्र गणवेशात जातात, पण आत कुठेतरी एक लेखक श्वास घेत असतो. थकलेल्या रात्री, शांततेच्या क्षणात, तो बंदूक बाजूला ठेवून भावना कागदावर उतरवतो. संघर्ष, वेदना, प्रेम आणि समाजाचं वास्तव — हे सगळं त्याच्या लेखणीतून वाहतं. देशसेवेची शपथ पाळताना, स्वतःचं स्वप्नही जपणारा तो सैनिक-लेखक आहे. ‘मुसंडी’ ही केवळ कादंबरी नाही, ती त्याच्या संघर्षातून जन्मलेली एक जिवंत कहाणी आहे.

 अभिप्राय

वाचक मुसंडी बद्दल काय बोलतात

Rating

“सैनिक म्हणून देशासाठी उभा राहणारा लेखक समाजातील अन्यायावर लेखणी चालवतो, हे विशेष वाटलं. ‘मुसंडी’मध्ये भावनांचा अतिरेक नाही, पण त्यांची तीव्रता जबरदस्त आहे. प्रत्येक  माणसाने वाचावी अशी कादंबरी.”

संदीप लहाने

सेवानिवृत्त जवान · जळगाव

Rating

अमोल भाऊ आणि अविनाश भाऊ या दोघा भावांचा खुप खुप अभिमान आहे .अमोल आणि अविनाश यांची कलाकृती म्हणून ही कादंबरी प्रत्येकाने वाचली पाहिजे, असे सुचवेल फक्त ही एक प्रेम कथा नाही तर जीवन जगण्यासाठी आवश्यक कला गुण कसे रुजतात आणि त्यासाठी करावा लागणारा टोकाचा संघर्ष गरजेचा का आहे ? हे या दोघा भावांनी खुप साधारण वाटणाऱ्या पण अत्यंत शुद्ध अशा रायबा नायकाद्वारे वास्तवात मांडले आहे. मला रायबा सोबत त्याचे वडील पण नायकच वाटतात प्रत्येकाला या कलाकृती चे नायक वेग वेगळे वाटतील आणि हेच या कलाकृती चे यश आहे असे मला वाटते ..... नावाप्रमाणेच ही कादंबरी मनात मुसंडी मारते. भाऊंना पुढील वाटचालीस मनस्वी खुप खुप प्रेममय शुभेच्छा..... 

 दिलीप किसनराव चव्हाण शिक्षक( जि. प. प्राथ. शाळा विहिरगाव /ब       ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया )

Rating

Hii सर माझं नाव शिवम काळे मी तुमची मुसंडी ही कादंबरी वाचली खूप छान वाटली त्यातील शब्द वाक्यरचना भाषा खूप छान ग्रामीण भागातील जशी असते तशी, वाचता वाचता खूप वेळा मी पण माझ्या भूतकाळात गेलो आणि खूप साऱ्या जुन्या आठवणीना उजाळा दिला ते शाळेतील दिवस आणि तेच सारं काही,पण सर मला हे कळलं नाही की त्यातील पात्र हे खरे होते कि काल्पनिक आणि कथा ही सत्य घटने वर होती कि काल्पनिक, पण असो कादंबरी वाचून खूप छान वाटलं आणि कथेचा शेवटही पाहिजे तसाच घडला.तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा .


Rating

“मुसंडी वाचताना केवळ कथा वाचत नाही, तर समाजाचा आरसा समोर उभा राहतो. रायबा आणि शीतलचं प्रेम मनाला चटका लावून जातं. ही कादंबरी प्रत्येक मराठी वाचकाने वाचायलाच हवी.”

अमोल देशमुख

वाचक · नाशिक

Rating

“एका सैनिक लेखकाची संवेदनशील लेखणी यात स्पष्ट जाणवते. जातीव्यवस्था, स्त्रीची भूमिका आणि प्रेम यांचा अत्यंत वास्तवदर्शी वेध घेतला आहे. पुस्तक संपल्यानंतरही विचार मनात घोळत राहतात.”

प्रिया जाधव

शिक्षिका · पुणे

An address must be specified for a map to be embedded